E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
हॉटेल ताज वरील हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा कोण आहे?
Samruddhi Dhayagude
11 Apr 2025
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा गुरूवारी भारतात दाखल झाला.राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडीयन नागरिक असून, त्याच्यावर २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सह-सूत्रधाराची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. कोण आहे हा तहव्वूर राणा?
राणा हा पाकिस्तानी लष्कराचा माजी डॉक्टर, व्यापारी आणि दहशतवादी आहे. १२ जानेवारी १९६१ रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चिचवतनी येथे त्याचा जन्म झाला. हसन अब्दल कॅडेट महाविद्यालयामधून त्याने वैद्यकीय पदवी प्राप्त केली. तिथेच त्याची दाऊद गिलानी उर्फ डेव्हिड कोलमॅन हेडली याच्याशी ओळख झाली होती. पाकिस्तान आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये कॅप्टन जनरल ड्युटी प्रॅक्टिशनर म्हणून काम केले. सैन्यदल सोडल्यानंतर राणा १९९७ मध्ये त्याच्या डॉक्टर पत्नीसह कॅनडात स्थायिक झाला.
व्यावसायिक कारकीर्द
आपल्या करिअरच्या सुरूवातीला त्याने पाकिस्तानी लष्करात डॉक्टर म्हणून सेवा दिली. १९९० च्या उत्तरार्धात कॅनडाचे नागरिकत्व मिळवले. तिथे शिकागो, न्यूयॉर्क आणि टोरंटो येथे फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस, हलाल कत्तलखाना असे वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. २००८ च्या मुंबई हल्ल्यात सहभाग असल्याबद्दल २००९ मध्ये त्याला साथीदार डेव्हिड कोलमॅन हेडली याच्यासह शिकागो येथून अटक करण्यात आली होती.
हेडलीसोबत हातमिळवणी
लष्कर-ए-तोयबाचा सदस्य डेव्हिड कोलमन हेडली ऊर्फ दाऊद सय्यद गिलानी हा राणाचा मित्र आहे. राणाने त्याच्या इमिग्रेशन कन्सल्टन्सीचा प्रतिनिधी म्हणून हेडलीला भारतात पाळत ठेवण्यासाठी आणि दहशतवादी कारवायांची रेकी करण्यासाठी पाठवले होते. २६/११ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करण्यासाठी दोघांनी मोहिमा आखल्या. ताजमहाल पॅलेस हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि नरिमन हाऊससारख्या ठिकाणांना त्यांनी लक्ष्य केले.
राणावरील आरोप
दहशतवादी कारवाया लपवण्यासाठी मुंबईत इमिग्रंट लॉ सेंटरची स्थापना करणे, २६/११ हल्ल्यामागील गुन्हेगारी कटाचा भाग म्हणून नोव्हेंबर २००८ मध्ये भारताचा दौरा करणे, भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे आणि हत्या असे आरोप राणावर आहेत.
तुरूंगात विशेष व्यवस्था
राणाला सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगातील अंडासेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. त्याच्यावर मुंबईत खटला चालवला जाणार असल्याने मुंबईतही तुरूंगातही व्यवस्था करण्यात आली आहे. अंतिम निर्णय न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून असणार आहे. तहव्वूर राणाला एका विशेष विमानाने भारतात आणण्यात आले. हे विमान दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरण्यात आले. यानंतर एनआयएने त्याला अटक केली.
भारताकडे सोपवण्यासाठी प्रयत्न
२६/११ च्या हल्ल्याशी संबंधित आरोपांचा सामना करण्यासाठी भारताने राणाला भारताकडे सोपविण्याची मागणी केली होती. त्यानंतर राणाने अमेरिकी कायद्यांचा उपयोग केला; परंतु यात त्याला यश मिळाले नाही. अमेरिकेच्या एका न्यायालयाने मे २०२३ मध्ये त्याला भारताकडे सोपविण्यास मान्यता दिली; मात्र त्यांचे कायदेशीर पथक या निर्णयाला आव्हान देत आहे.
हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू
२६/११ च्या हल्ल्यात एकूण १६६ जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यात सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश होता.
तहव्वूरची अजब मागणी
मुंबई हल्ल्यातील मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च सैन्य किताब देण्याची मागणी राणाने पाकिस्तान सरकारकडे केली होती. स्वतःच्या प्रत्यर्पणाविरोधात त्याने अमेरिकेतील जवळपास सर्वच न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. तिथल्या सर्वोच्च न्यायालयात त्याचे अपिल फेटाळल्यानंतर त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला.
२०११ मध्ये डॅनिश वृत्तपत्रावर हल्ला
२०११ मध्ये डॅनिश वृत्तपत्रावर हल्ला करण्याचे कारस्थान रचल्याप्रकरणी राणाला दोषी ठरविण्यात आले होते; परंतु २६/११ च्या हल्ल्याशी थेट संबंधित आरोपातून त्याला निर्दोष ठरविण्यात आले. त्यामुळे २०१३ मध्ये भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने दिल्लीच्या न्यायालयात राणा यांच्या अनुपस्थितीत त्यांच्यावर आरोप लावले आणि त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तेव्हापासून भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होते.
कोण आहेत विशेष सरकारी वकील नरेंद्र मान?
केंद्रीय गृह मंत्रालयाने तहव्वूर हुसेन राणाविरुद्धच्या दिल्लीतील खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून वकील नरेंद्र मान यांची नियुक्ती केली आहे. मान यांनी १९९० मध्ये दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर, त्यांनी केंद्रीय गुप्तचर विभागाचे (सीबीआय) प्रतिनिधित्व केले. जानेवारी २०११ ते एप्रिल २०१९ दरम्यान ते दिल्ली उच्च न्यायालयात सीबीआयचे विशेष सरकारी वकील होते. सीबीआयचे वकील म्हणून मान यांनी फौजदारी अपील, रिट अर्ज असे विविध खटले हाताळले. त्यांनी वैद्यकीय परिषद गैरव्यवहार, एआयसीटीई गैरव्यवहार, सीडब्ल्यूसी प्रकरण, सीजीएचएस सोसायटी गैरव्यवहार, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, बँकिग प्रकरणासह जैन-डायरी हवाला प्रकरण, जेएमएम खासदार प्रकरण, बोफोर्स प्रकरण आणि सहकारी सोसायटीसह आदी प्रकरणे हाताळली आहेत.
बत्रा, रॉय यांची विशेष भूमिका
तहव्वूर हुसेन राणा याला अमेरिकेतून भारतात आणण्याची जबाबदारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दोन वरिष्ठ अधिकार्यांवर सोपवण्यात आली होती. यामध्ये एनआयएचे महानिरीक्षक आशिष बत्रा, उपमहानिरीक्षक जया रॉय यांचा समावेश होता. या दोन्ही अधिकार्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
एनआयएचे हे पथक तहव्वूरला भारतात आणण्यासाठी रविवारीच अमेरिकेत पोहोचले होते. मंगळवारी सायंकाळी लॉस एंजेलिसमध्ये उपमहानिरीक्षक जया रॉय यांनी तहव्वूरला ताब्यात घेण्यासाठी ‘सरेंडर वॉरंट’वर स्वाक्षरी केली होती. यानंतर, भारतीय पथकाने बुधवारी सकाळी एका खास विमानाने विशेष भारताकडे रवाना केले होते. या कारवाईत इतर तीन गुप्तचर अधिकार्यांनीही सहकार्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी बत्रा हे झारखंड केडरचे आहेत. ते सध्या एनआयएमध्ये महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. २०१९ मध्ये पाच वर्षांसाठी त्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली होती, जी गृह मंत्रालयाने १५ सप्टेंबर २०२४ नंतर आणखी दोन वर्षांसाठी वाढवली आहे.एनआयएमध्ये दाखल होण्यापूर्वी, बत्रा २० जानेवारी २०१८ पासून झारखंड जग्वार्स (एक विशेष बंडखोरी विरोधी युनिट) चे महानिरीक्षक म्हणून काम करत होते. ते झारखंड पोलिसांचे प्रवक्ते देखील राहिले आहेत.
२०११ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी जया रॉय देखील झारखंड केडरच्या आहेत. सध्या त्या एनआयएमध्ये उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
२०१९ मध्ये, त्यांना एएनआयमध्ये चार वर्षांसाठी पोलिस अधीक्षक म्हणून प्रतिनियुक्त करण्यात आले होते.रॉय यांनी जामतारा येथे सायबर गुन्हेगारांविरुद्ध मोठी कारवाई केली. त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली ती मोहीम एक वेब सीरिजही प्रदर्शित झाली आहे.
Related
Articles
आणखी हल्ल्यांची तहव्वूरने केली होती आखणी
12 Apr 2025
मधमाश्यांचा विद्यार्थ्यांवर हल्ला; १३ जण जखमी
16 Apr 2025
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
17 Apr 2025
पश्चिम बंगालमध्ये ईडीकडून छापे
16 Apr 2025
मुक्त व्यापार करुन चीन देणार अमेरिकेला शह
16 Apr 2025
घोडेगाव परिसरात डीजेचा दणदणाट
14 Apr 2025
आणखी हल्ल्यांची तहव्वूरने केली होती आखणी
12 Apr 2025
मधमाश्यांचा विद्यार्थ्यांवर हल्ला; १३ जण जखमी
16 Apr 2025
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
17 Apr 2025
पश्चिम बंगालमध्ये ईडीकडून छापे
16 Apr 2025
मुक्त व्यापार करुन चीन देणार अमेरिकेला शह
16 Apr 2025
घोडेगाव परिसरात डीजेचा दणदणाट
14 Apr 2025
आणखी हल्ल्यांची तहव्वूरने केली होती आखणी
12 Apr 2025
मधमाश्यांचा विद्यार्थ्यांवर हल्ला; १३ जण जखमी
16 Apr 2025
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
17 Apr 2025
पश्चिम बंगालमध्ये ईडीकडून छापे
16 Apr 2025
मुक्त व्यापार करुन चीन देणार अमेरिकेला शह
16 Apr 2025
घोडेगाव परिसरात डीजेचा दणदणाट
14 Apr 2025
आणखी हल्ल्यांची तहव्वूरने केली होती आखणी
12 Apr 2025
मधमाश्यांचा विद्यार्थ्यांवर हल्ला; १३ जण जखमी
16 Apr 2025
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
17 Apr 2025
पश्चिम बंगालमध्ये ईडीकडून छापे
16 Apr 2025
मुक्त व्यापार करुन चीन देणार अमेरिकेला शह
16 Apr 2025
घोडेगाव परिसरात डीजेचा दणदणाट
14 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार